Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समृद्धी महामार्गवर भीषण अपघात : मुलगा, वडील जागीच ठार तर आई, बहिण गंभीर !
    क्राईम

    समृद्धी महामार्गवर भीषण अपघात : मुलगा, वडील जागीच ठार तर आई, बहिण गंभीर !

    editor deskBy editor deskAugust 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना दि.15 ऑगस्ट रोजी 12 वाजेच्या दरम्यान चारचाकी कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.  वाशिम जिल्ह्यातील वनोजा-शेलुबाजार जवळ असलेल्या IC9 टोल प्लाझा जवळ दि.15 ऑगस्ट रोजी 12 वाजताच्या दरम्यान कारचा भीषण भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कारमधील वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात कार चालकाला झोप लागल्यामुळे घडल्याची माहिती मिळत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाने मुंबई वरून वर्धा येथे जात असताना MH 43 BK 6284 क्रमांकाच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या MH 04 HD 9981 क्रमांकाच्या आयशर ट्रकला मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा समोरचा भाग पूर्ण चुरा झाला असून, कारमधील चालक पराग सोनार वय 45, अनिस सोनार वय 9, याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दिपाली सोनार वय 40, रसूल सोनार वय 15 राहणार नवी मुंबई आणि ट्रक चालक नवनाथ वायचाळे जखमी झाले असून, यांना शेलुबाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत.

    यावेळी समृद्धी महामार्गाच्या बाजूला शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी याची माहिती संबंधित यंत्रणेला दिली. यांनातर अपघात स्थळी समृद्धी महामार्गावरील रेस्क्यू टीम यांनी दाखल होऊन, कारचे काच फोडून जखमींना बाहेर काढून, समृद्धी महामार्गावरील 108 रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथे उपचाराकरिता पाठविले. कारची समोरची बाजू पूर्ण चुरा झाली असल्यासाने मृत चालकाला बाहेर काढता येत नव्हते. रेस्क्यू टीमने ग्राइंडर व ईतर यंत्राच्या साह्याने अर्ध्या ते एक तासानंतर बाहेर काढले.
    सदर ट्रक चालक ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे, महामार्गावर ट्रक बाजूला उभा करून ट्रक खाली जाऊन काम करत होते. याचवेळी कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रक सोमोर गेला आणि त्याखाली असलेला ट्रक चालक ही फेकल्या गेल्यामुळे तेही जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आढे, पीएसआय दिनकर राठोड, पोलीस कर्मचारी प्रमोद वानखेडे, रन्नु रायलीवाले, संजय घाटोळे, सुरेंद्र तिखिले, समृद्धी महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर राठोड, आनंद काकडे, यांनी घटनास्थळी दाखल होऊन भेट दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.