मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येवून धडकल्या असतांना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जोरदार सुरु असतांना नुकतेच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय द्यायचा नाही ठरवले आहे. त्यामुळे गोरगरिबांनी ठरवले आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. 20 तारखे पर्यंत चित्र बदललेले दिसत, देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे. मला हलक्यात घेऊ नका, मी एकदा राजकारणात घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, आमची आणखी तरी प्रामाणिक भूमिका आहे. मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यामध्ये ढकलू नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेली गणितं सगळी चुकणार आहेत. मला हलक्यात घेऊ नका. माझी इच्छा नाही. राजकारणात मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही. मी शेतकऱ्यांपासून 12 बलुतेदारांचे, ओबीसी, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, मराठ्यांचे राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही. फडणवीस साहेब तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर घ्या. नसेल घ्यायचं तर माझा नाईलाज आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला राजकारणात जायचे नाही. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, तुमचे दोन-चार जण म्हणत आहेत की मी राजकीय भाषा बोलत आहे. तुम्ही आरक्षण देणार नसलात तर मी राजकीय भाषा बोलू नको तर कोणती भाषा बोलू? तुम्ही आरक्षण द्या. राजकीय भाषा बंद करतो. पण तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग मी भाषा बोलू कोणती? असा सवाल मनोज जरांगे पाटील यासंनी उपस्थित केला आहे.