नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली असतांना आज पहाटेच्या सुमारास एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील महाराष्ट्रासह 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही निवडणुका होणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत 14 ऑगस्ट रोजी बैठक घेतली होती. 9 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या टीमसह जम्मू-काश्मीरला भेट दिली. 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाचे हे निर्देश जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णयाचा एक भाग होता.
जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि तेथे निवडणुका व्हाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा परत करावा. लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले होते- आधी परिसीमन आणि नंतर विधानसभा निवडणुका जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी 11 ऑगस्ट रोजी सांगितले होते – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले होते की, आधी परिसीमन होईल, नंतर विधानसभा निवडणुका आणि नंतर योग्य वेळी राज्याचा दर्जा दिला जाईल. सर्व गोष्टी त्याच क्रमाने चालू आहेत.
20 जूनला पंतप्रधान मोदी श्रीनगरला आले होते, असे ते म्हणाले होते. तेव्हा त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोगाच्या पथकाने येथे भेट दिली आहे. लोकांना भेटले. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत