जळगाव : प्रतिनिधी
पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी छात्रभारती जळगाव वतीने आज 14 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन करण्यात आली. कला, शास्त्र व वाणिज्य या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांना या योजनेतून वगळल्यामुळे 12 लाखांपेक्षा अधिक पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे नुकसान होणार आहे.
त्यामुळे व्यावसायिक शिक्षणासोबतच पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनाही शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष संदिप जाधव, तालुका उपाध्यक्ष भुषण पाटील, उपजिल्हाध्यक्ष ज्योती पाटिल. राहुल पाटिल.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.