चोपडा : प्रतिनिधी
शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. गुन्ह्यातील आरोपीस चोपडा शहर पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारातील १० वर्षीय मुलीचा आरोपी सलमान खान अख्तर खान (२८, हमीदनगर, चोपडा) याने सोमवारी राहत्या घरात घुसून विनयभंग केला. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण, तसेच अनु. जाती- जमाती अत्याचार कायदा, पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता, आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तपास पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे करीत आहेत.