जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल ४१४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातून आज २२१ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
आलेल्या अहवालानुसार जळगाव शहर-११६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-७९, अमळनेर-२०, चोपडा-७८, पाचोरा-१७, भडगाव-५, धरणगाव-४, यावल-१, एरंडोल-४, जामनेर-३२, रावेर-०, पारोळा-१६, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४१४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हार ११९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ३१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २२६ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.