लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राजकीय विशेष
एरंडोल तालुक्याला फार मोठा राजकीय वारसा आहे. परंतु 2009 च्या विधानसभा रचनेनुसार एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ झाल्यानंतर एरंडोल तालुक्याला अवकाळा आले आहे. एरंडोल तालुक्यातील सहकाराचे नेतृत्व याच गद्दारांनी संपवले आहे. जिल्हा बँकेत दहा वर्षांपूर्वी राजपूत समाजाचे नेते हे संचालक होते त्या अगोदर मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते हे संचालक होते परंतु गेल्या दहा वर्षात घरातच सहकाराचे महत्वपूर्ण पद ठेवले आहे. एरंडोल तालुक्यात सहकाराचे नेतृत्व करणारे दुसरे कोणी नव्हते का असा प्रश्न एरंडोल तालुक्यातील जनतेला पडला आहे. अनेक सहकारी संस्था देखील यांनी वाट लावली आहे.
आता तर खोक्यांच्या भरोसे अनेकांना विकत घेण्याची भाषा सुरू आहे. याच खोक्यांचा प्रयोग पारोळा बाजार समिती निवडणुकीत झाला. सुमारे चार ते पाच करोड रुपयांचा चुराडा करूनही गद्दारांना यश आले नाही. जनता सोपी नाही आहे सर्व ओळखून आहे म्हणून गद्दारांना आता तारा नाही असे चित्र निर्माण झालेले आहे. अनेक शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेले आहेत परंतु सत्ता गद्दारांच्या असल्यामुळे कोणीही बोलू शकत नाही हुकूमशाही दडपशाही सुरू आहे कुठल्याही गुन्ह्यात अडकून टाकतील म्हणून शांत आहे हा उद्रेक आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खोक्याच्या भरोसे किती राजकारण यशस्वी होते याकडे लक्ष असून गद्दार कितपत यशस्वी होतात हे आगामी काळ सांगेल. एरंडोल तालुक्यात अनेक नेतृत्व संपवण्याच्या घाट या गद्दाराने रचला आहे आता एरंडोल तालुक्यातच आमदार पाहिजेत अशी भावना देखील निर्माण झाले आहे. अल्पसंख्यांक समाज एकत्र होण्यास सुरुवात झाली असून माळी समाजाला देखील दाबून टाकले असल्याने या गद्दारा विरुद्ध मोठा समाज नाराज झाला आहे. माळी समाजाचे नेते नाना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असल्याने त्यांचीही वाट लावण्याची काम गुप्तरित्या सुरू आहे.
मराठा समाजाचे नेतृत्व माऊली मुकाट्याने गाडीत बसलेले आहे. तर दुसरे प्रत्येक गावात ठेकेदारांचे जाडे निर्माण करून गुंडगिरी वाढवली आहे भविष्यात एरंडोल चे भुसावळ होण्यास वेळ लागणार नाही असे चित्र या खोक्या वाल्यांनी सुरू केले आहे. एरंडोल तालुक्याचे सहकाराचे नेतृत्व संपले असून कोणी या पदासाठी लायक नाही का असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.