जळगाव : प्रतीनिधी
जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसे तसे सर्वच पक्षांनी सर्व सुरू केले आहे. जळगाव शहरासाठी पुन्हा उमेदवार रिपीट केला तर धोका होण्याची शक्यता अनुलोप या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व माहिती पुढे आले असल्याची विश्वासनीय सूत्रांकडून समजते.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपाला ताब्यात ठेवणे गरजेचे आहे महापालिका क्षेत्र असल्यामुळे शहरी मतदार हा भाजपाच्या बाजूने आहे परंतु उमेदवाराच्या बाबतीत निगेटिव्ह सेट झाला असल्याने नकारात्मकता मामा विषयी वाढत चाललेली आहे. शहरातील रस्त्यांना मामा जबाबदार अशा पद्धतीने मांडणी विशेषता पक्षांतर्गतच होत आहे. भाजपामध्ये दोन गट असल्याने मामा विषयी प्रचंड नाराज निर्माण झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच पक्षांतर्गत मोठा सर्वे आल्याने मामा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिला परंतु शहरात निगेटिव्ह सेट असल्याने अडचणी वाढलेले आहे. मामा बदलाचे वारे पक्षांतर्गतच सुरू आहेत यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा जळगाव शहरात नवीन चेहरा येणार की पुन्हा मामा रिपीट होणार याकडे लक्ष लागून आहे.