भुसावळ : वृत्तसंस्था
रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई-नागपुर आणि नागपूर – पुणे दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे..
लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई-नागपुर विशेष (2 सेवा)
०२१३९ विशेष दि. १५.०८.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपुर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)
०२१४० विशेष दि. १६.०८.२०२४ रोजी नागपुर येथून १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. (१ सेवा)
थांबे -: ठाणे, कल्याण, नासिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा.
संरचना: एक वातानुकूलित-प्रथम, ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, आणि २ जनरेटर व्हॅन.
नागपुर -पुणे विशेष ( ४ सेवा)
०२१४४ विशेष दि. १४.०८.२०२४ आणि दि. १६.०८.२०२४ रोजी नागपुर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
०२१४३ विशेष दि. १५.०८.२०२४ आणि दि. १७.०८.२०२४ रोजी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि नागपुर येथे ०६.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे -: वर्धा, धामणगांव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरली.
संरचना: १४ वातानुकूलित-तृतीय, आणि २ जनरेटर व्हॅन.