रावेर: प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील एक गावठी कट्टे विक्रीसाठी आला असता पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री ९ वाजता अटक केली. तोफसिंग चावला असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पाल-खरगोन रस्त्यावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशाच्या सीमेवर एक जण गावठी कट्टा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तोफसिंग चतरसिंग चावला (वय २७, रा. धसली, ता. झिरण्या, जि. खरगोन) याच्याकडून दोन देशी कट्टे आणि दोन काडतुसे जप्त केली आहे.
फौजदार तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने पाल खरगोन रस्त्यावरील हॉटेलजवळ सापळा रचला आणि आरोपी चावला याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन पिस्तुले, दोन काडतुसे असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना दि. १० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ही कारवाई पोहेकॉ रवींद्र वंजारी, पोकॉ सचिन घुगे, पोकों विशाल पाटील, पोकों प्रमोद पाटील, पोकों महेश मोगरे व विकार शेख यांचे पथक तातडीने रवाना केले. पुढील तपास फौजदार तुषार पाटील हे करीत आहेत.