जळगाव | राजकीय विशेष
राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला असल्याने नुकताच भाजपाचा नवीन सर्व्हे आला असून चेहरे बदलले तर यात 80 ते 90 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देण्याच्या तयारीत आहे यात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे ही नाव आहे. यामुळे मामाची चांगलीच कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला 105 जागा मिळाल्या त्यानंतर 2024 ला लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 23 खासदारांना जनतेने नाकारले आहे केवळ दोनच खासदार जुने चेहरे आहेत. भाजपाने नुकताच सर्वे केल्यानुसार असे चित्र राहिले तर राज्यात केवळ भाजपाच्या 80 ते 90 जागा विजयी होण्याची शक्यता आहे या 80 ते 90 जागा चेहरे बदलले तर येणार आहेत मग विद्यमान आमदारांना संधी दिली तर मोठा फटका बसण्याची शक्यता सर्व्हे मध्ये आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर निश्चितच या जागा 80 90 वर थांबतील असा देखील सर्व्हे आल्याने जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची संधी नवीन चेहऱ्याला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव शहरात भाजपा संघटनात्मक दृष्ट्या सांभाळण्यात मामाला फारसे यश आले नाही वजन पडत नसल्यामुळे अनेक जण नाराज आहे.
तसेच मराठा व कोळी समाज मामा पासून लांब गेला असल्याने भाजपाला फार मोठे संकट निर्माण झाले आहे ही वोट बँक सांभाळण्यासाठी नवीन चेहऱ्याला भाजपा संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गटातटाच्या राजकारणामुळे देखील भाजप नेतृत्व कोंडीत सापडलेले आहे भाजपातील शहरात अनेक दुखी आत्मा पुढे आले असून दोन गट सरळ सरळ निर्माण झाले आहे. भाजपाने लेवा समाजाला फार मोठी संधी दिली असल्याने मामाचे तिकीट कट करणे भाजपासाठी फार अवघड नाहीये म्हणून लेवा समाज नाराज होणार नाही याची शक्यता आता नाही अगोदरच केंद्रीय मंत्री आमदार खासदार समाजाचे असल्यामुळे जळगाव शहराच्या जागेवर लेवा समाजव्यतिरिक्त इतर समाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.