Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा हादरला : दगड टाकून २५ वर्षीय तरुणाचा खून !
    एरंडोल

    जिल्हा हादरला : दगड टाकून २५ वर्षीय तरुणाचा खून !

    editor deskBy editor deskAugust 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ दि.१० रोजी मध्यरात्री १२ ते ४ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमांनी एका २५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा या गावात दि.१० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास याच गावातील जुनी भिलाटी येथील रहिवासी इंदल प्रकाश वाघ (वय २५) हा दगड फोडून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करीत असून गेल्या काही दिवसापासून त्याची पत्नी त्याच्या सोबत राहत नसून तो आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून दि.१० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरून बाहेर पडला असता. मध्यरात्री बस स्थानकानजीक रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान काही अनोळखी इसमांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

    याप्रकरणी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सावदा गावाचे पोलीस पाटील पवार यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी धरणगाव पोलीस निरीक्षक पंकज देसले, प्रभारी एपीआय प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार वसंत निकम, पोलीस शिपाई प्रदीप सोनवणे, मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सीएमओ निरजन देशमुख यांनी त्याला मयत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.