प्रतिनिधी प्रविण पाटील। तालुक्यातील विटनेर येथे गांधी रिसर्च फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोफत मोतीबिंदू शिबीराचे आयोजन शनिवारी २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.
गांधी रिसर्च फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विटनेर ग्रामपंचायत कार्यालयात मोफत मोतीबिंदू शिबिर ठेवण्यात आले आहे. विटनेर गावासह वसंतवाडी, जळके, सुभाषवाडी,वराड व परिसरातील वृद्ध व्यक्ती यांनी मोतीबिंदूचा तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन ठिबक सिंचनचे संचालक तसेच जळगाव तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष पी.के.पाटील व गांधी रिसर्च फाउंडेशनचे मयुर गिरासे यांनी केले आहे.