Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी
    तालुक्यातील पहूर येथील राष्ट्रीय महामार्गावर वाकोद गावाच्या पुढे हॉटेल सिंहगड जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. ९ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत असे कि, छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने रात्री अकरा वाजता हॉटेल सिंहगड जवळ एका चाळीस वर्षीय इसमाला चिरडले. यामध्ये त्या अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पहुर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आणला. दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयातच ठेवण्यात आलेले आहे आणि ओळख पटविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ दीपक सुरवाडे करीत आहे. महामार्गावरुन अत्यंत निदर्योपणे वाहन चालविणाऱ्यांकडून रस्त्याने जाणाऱ्या निरपराध नागकिांचा जीव घेतला जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटू लागली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.