Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बांधकाम व्यावसायिकाची तरुणाने केली लाखो रुपयात फसवणूक
    क्राईम

    बांधकाम व्यावसायिकाची तरुणाने केली लाखो रुपयात फसवणूक

    editor deskBy editor deskAugust 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    बँकेत कामाला असल्याचे सांगून कपिल राजू पाटील (२१, रा. चंदू अण्णानगर) याने बांधकाम व्यावसायिक विनोद हंसराज बडगुजर (४८, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरू करून परस्पर एक लाख १३७ रुपये काढून घेतले. मात्र पोलिसात तक्रार देण्याविषयी सांगताच या तरुणाने ९७ हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यावर जमा केले. उर्वरित रक्कम जमा न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. ही घटना ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्यानंतर शुक्रवारी (९ ऑगस्ट) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक विनोद बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या क्रेडिट कार्डचा वापर दोन महिन्यांपासून न केल्यामुळे ते कार्ड बंद पडले. कार्ड देणारा कपिल राजू पाटील (३१, रा. चंदू अण्णानगर) हा ४ ऑगस्ट रोजी बडगुजर यांच्या घरी गेला व त्याने तुमचे बंद पडलेले कार्ड जमा करण्यासाठी आल्याचे सांगून ते कार्ड घेतले. ८ ऑगस्ट रोजी बँकेतून बडगुजर यांना फोन आला व क्रेडिट कार्डद्वारे एक लाख १३७ रुपये खर्च केल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बडगुजर हे पोलिस ठाण्यात पोहचले. त्यावेळी पाटील याने चौकशीत ९७ हजार रुपये क्रेडिट कार्डवर जमा केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र अजूनही तीन हजार १३७ रुपये जमा केले नाहीत. बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कपिल पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. रवींद्र सोनार करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.