Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
    क्राईम

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

    editor deskBy editor deskAugust 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चुकीच्या दिशेने (राँग साईड) जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (४५, रा. सदोबा नगर) हे ठार झाले. हा अपघात शुक्रवारी (९ ऑगस्ट) रात्री महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सदोबा नगरातील रहिवासी योगेश ढाके हे नशिराबाद येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होते. शुक्रवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीपी ४६६०) घरी परतत होते. नशिराबादपासून काही अंतरावर आल्यानंतर समोरून राँग साईडने एक ट्रक (क्र. एमएच १८, बीजी २९३७) नशिराबादकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ढाके हे बाजूला फेकले गेले व ते ठार झाले. अपघातानंतर ट्रक मधोमध थांबला होता. त्यामुळे रहदारीलादेखील अडथळा झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, संजय महाजन, पोकों सागर भिडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ढाके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तसेच क्रेन बोलवून दुचाकी काढली व ट्रक रस्त्याच्या बाजूला केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.