जळगाव : प्रतिनिधी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित असे यश आलेले नाही नऊ खासदारांपैकी सात नवीन चेहऱ्यांना संधी जनतेने दिलेले आहे. नितीन गडकरी व रक्षा खडसे वगळता भाजपाचे सात नवीन चेहरे खासदार झाले असल्याने हाच फार्मूला आगामी विधानसभा निवडणुकीत राबविला जाणार आहे. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत देखील भाजपा भाकरी फिरवणार असल्याचे बोलले जात आहे.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत 25 खासदार भाजपाचे निवडून आले होते. आता केवळ नऊ खासदार निवडून आलेले आहे. महाराष्ट्रातील जनतेने नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये झालेल्या चर्चेत जळगाव शहर विधानसभेच्या जागेवर नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जनतेमध्ये मामा विषयी प्रचंड नाराजी असल्याने सर्वे रिपोर्टनुसार देखील जागा फेरफार करणे आवश्यक झाले आहे.
त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते जळगाव शहराची जागा ही हक्काची जागा असल्याने कशी गमवणार त्यामुळे भाजपाचे डॉ.अश्विन सोनवणे, रोहित निकम, सुनील खडके, डॉ.राधेश्याम चौधरी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव शहराचा विकासाचा आलेख उंचावत असला तरी प्रभावीपणे कामे करण्यात व जनतेपर्यंत भाजपा पोहोचण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे. भाजपा विषयी शहरात निगेटिव्ह सेट झाले असल्याने अडचणीचे ठरणार आहे. यासाठी जनतेपर्यंत प्रभावी मांडणी करणारा चेहरा सध्या भाजपला हवा असल्याने जळगाव शहराची भाकरी भाजपाचे ज्येष्ठ नेते फिरवणार असल्याचे कालच्या बैठकीत ठरले असल्याचे विश्वसनीय सूत्रानुसार समजते.