छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या १ ऑगस्टपासून राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असल्याने ते सध्या मराठवाडा दौऱ्याचा आज समारोप होत असून १ वाजेच्या दरम्यान त्यांचे शहरात आगमन झाले. हर्सुल परिसरात येताच मोठ्या उत्साहात जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला.
यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागून शरद पवार व उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आपल्याकडे सध्या केवळ जातीचे राजकारण केले जाते. जातीच्या राजकारणातून जनतेची माथी भडकवली जात आहेत. काल बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या पोरांनी मार मार मारले. नशीब पोलिस मध्य पडले. यापुढे माझ्या नादी लागू नका, अन्यथा माझी पोरं तुमची गालं लाल करतील, असे ते आपल्या विरोधकांना इशारा देत म्हणाले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मनोज जरांगेंच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत आहे. काही पत्रकार हे सुद्धा राजकारण करत आहेत. त्यापैकी कुणाला कंत्राट मिळाले, तर कुणी गाड्या घेतल्या. कुणाला भुखंड मिळाला, हे सर्व मला माहिती आहे. त्यांची माहिती मी देणार असून त्यांची लवकरच चौकशी लावली जाईल्, असे ते म्हणाले. माझ्या नादी लागू नका. माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहोळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. त्यामुळे माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असेही राज ठाकरे यावेळी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना इशारा देताना म्हणाले.