चाळीसगाव : प्रतिनिधी
रुग्णवाहिकेतून नाशिक येथे नेत असताना रुग्णवाहिकेतील अपघाग्रस्त युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कळवाडी फाट्यानजीक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. ज्ञानेश्वर हरी बच्छे यांचा काही दिवस आधी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले. सायगाव येथे परतल्यावर त्यांना पुन्हा मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यांना नाशिक येथे रुग्णवाहिकेने जात असताना शुक्रवारी सायंकाळी कळवाडी फाट्याजवळ अपघात झाला. त्यात बच्छे (वय २७) यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्या रुग्णवाहिकेची धडक अन्य चारचाकी वाहनाशी झाली.
बच्छे हे सायगाव परिसरातील भजनी मंडळात वादक म्हणून काम करत होते. काही दिवस आधी दुचाकी अपघातानंतर तातडीने बच्छे यांना नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. ते घरी परत व काही दिवसातच र त्यांना गुरुवारी रात्री मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. नातेवाइकांनी जवळच असलेल्या पिलखोड येथील रुग्णवाहिका बोलावली. बच्छे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे.