जळगाव : प्रतिनिधी
घर बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणावेत, तसेच लग्नात एसी व बुलेट दिली नाही म्हणून उजमाबी रिजवान शेख (वय २४) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वर्ष २०१९ पासून ते जुलै २०२४पर्यंत सुरू होता. तसेच पतीने २२ जून २०२४ रोजी ‘मी तुला पहिला तलाक देत आहे’ असा मजकूर लिहून पत्र पाठविले.
याप्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती रिजवान मोहम्मद रफिक शेख याच्यासह सासरच्या चारजणांविरुद्ध बीएनएस कलम ८५, ११५(२), ३५२, ३ (५), मुस्लिम महिला विवाह अधिनियम २०१९ कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.