जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील माजी उपसरपंच सौ.अनिता संजय चिमणकारे यांची शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पक्षाच्या मागासवर्गीय महिला जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊ नन्नवरे व जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सरीता बी.माळी(कोल्हे) यांच्या स्वाक्षरी पत्राद्वारे करण्यात आली. या नियुक्ती बद्दल जळगाव तालुका शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले