जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून खोके कमवून या खोक्यांच्या भरोसे तालुक्यातील जनतेला विकत घेण्याची भाषा गद्दाराचा निष्क्रिय मुलगा सध्या करीत असून यामुळे जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात चीड आज देखील कायम असून गेल्या जि.प.निवडणुकीत एका खेडेगावात संस्थाचालकाच्या प्रचारासाठी गेलेल्या शिक्षकाला रक्त पडेपर्यंत मारहाण करून या दलित समाजाच्या शिक्षकाला मारहाणीचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला होता.
इतका उदमाप या खोक्यावाल्याच्या मुलाला असून दलित समाज आजही या घटनेला कधीही विसरू शकत नाही. विशेष म्हणजे त्या काळात राजकीय दबाव आणून तो गुन्हा मागे देखील घेण्यात आला. या प्रकरणात खोक्यावाल्याचा मुलगा फरार देखील होता. पारोळा तालुक्याला या निष्क्रिय मुलाचे प्रताप अनेकांना माहिती आहे. परंतु काही ठेकेदार पैशांसाठी लाचार असून या निष्क्रिय मुलाच्या दारात पायघद्या टाकत आहेत. आजही सुज्ञ समाज हे मान्य करायला तयार नाही. परंतु अमाप पैसा आल्यामुळे मोठी घमेंड यांना आलेली असून जनता ते विसरणार नाही. कासोदा तालुका एरंडोल येथील एका आदिवासी कुटुंबाची जमीन या निष्क्रिय मुलाने पचवली.
रात्रीतून त्यांच्या झोपड्या हटवल्या हे प्रकरण ताजे आहे. आदिवासी समाजामध्ये देखील या गद्दार व खोकेवाल्या विषयी प्रचंड चीड आहे. आता अमाप पैशाच्या जोरावर मुलाची राजकारणात लॉन्चिंग करण्यासाठी ही धडपड त्या खोक्यावाल्याची सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत मुलाला आमदार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु आगामी पाच वर्ष शांत व आपल्या जमिनी सुरक्षित ठेवायचे असतील तर या खोकेवाल्यांना जागा दाखवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखविणार अशी जोरदार चर्चा मतदार संघात सुरु आहे.