जळगाव शहरात भाजपा नव्हे…’मामा पार्टी’..!
जळगाव: जळगाव शहरात नवीन राजकीय समीकरण जुळले असून भाजपा नव्हे..मामा पार्टी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बोटावर मोजण्याइतके काही नगरसेवक सोडले तर मामा पार्टीच्या बाजूने कुणीही नाही. जळगाव शहरातील जनतेने भाजपाला जळगाव महापालिकेत एक हाती सत्ता दिली. पण ही सत्ता देखील मामा पार्टीला सांभाळता आली नाही. शहरात खड्डेमय रस्ते हे काही नवीन नाही. राज्य शासनाने करोडो रुपये निधी दिला परंतु मामा पार्टीने कुठलीही नियोजन न केल्यामुळे गेल्या पाच वर्षात शहराचा विकास हा भकास करून टाकला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ६३ हजाराचे मताधिक्य मिळाले हे मामा पार्टीचे योगदान नव्हे तर भाजपाचे योगदान आहे. परंतु मामा पार्टी याचे हे श्रेय घेत आहे. मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी अपार कष्ट करून ५७ नगरसेवक भाजपाचे निवडून आणले मामा पार्टीच्या घरात महापौर पद दिले परंतु मामा पार्टीला तेही सांभाळता आले नाही. सर्व नगरसेवक मंत्री महाजनांना धक्का देत फुटले हे अपयश मामाचे आहे. मामा पार्टी फक्त सामाजिक राजकीय फायदा घेत आहे. प्रत्यक्षात जळगाव शहराची वाट मामा पार्टीने लावली आहे. शहरातील समांतर रस्त्याचा अजूनही प्रश्न मामा पार्टी सोडू शकली नाही. दहा वर्षात केंद्र शासनाने जे पूल तयार केले त्याचे श्रेय मामा पार्टी घेत आहे, यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. शहरातील नागरिक महापालिकेला प्रचंड कर भरून खड्डेमय रस्त्याचा मनस्ताप सहन करत आहे जळगाव शहरातील अस्थितज्ञ डॉक्टरांची ओपीडी किती वाढली आहे. हे जरा आकडे मामा पार्टीने प्रत्येक दवाखान्यात जाऊन घ्यावे तेव्हा समजेल की कुठे नेऊन ठेवलाय माझा जळगाव. जातीपातीच्या पलीकडे राजकारण करा तर जळगावचा विकास होईल अन्यथा भविष्यातील आमदार देखील दारावर, मरणावर, लग्नाला, जाऊळच्या कार्यक्रमाला, जाणारा हवा असेल तर पुन्हा मामा पार्टी २०२४ ला येईल यात शंका नाही विकास हवा असेल तर मामा पार्टी हटवा, हे जेव्हा शहरातील जनतेला व भाजपाच्या नेत्याला कळेल तेव्हाच जळगाव शहराचा विकास होईल. अन्यथा मामा पार्टीचा विकास होईल शहराचा विकास मात्र भकास होईल एवढे मात्र निश्चित.