मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या मागील वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी फुट पाडून महायुतीमध्ये सामील झाल्यावर त्यानंतर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भेटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेचा तापले होते मात्र नुकतेच अजित दादांनी मोठे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना मी विधानसभेत वरिष्ठ आहे. पण मी नव्वदच्या बॅचचा आहे. पण ते सगळे पुढे गेले, मी मागेच राहिलो, तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितले इतके आमदार आणलात तर मुख्यमंत्री करतो, मला जर सांगितले असते तर सगळी पार्टी घेऊन आलो असतो, शेवटी नशिबात असते तेच होते, असा मिश्कील टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ठाण्यात लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील लेखक प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या योद्धा कर्मयोगी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त करीत आजच्या राजकारणात कुणी ढेकूण बोलतोय, कुणी काय बोलतोय,महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील राजकीय संस्कृती राहिली नसल्याची खंत व्यक्त केली. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांनी जवाबदारी घेतल्यावर हा पहिला कार्यक्रम आहे. ठाण्याच्या ऐतिहासिक नगरींत खूप काही घडले. आहे.शेतकरी कुटूंबातील मुलगा या परिसरात येतो काय ? नगरसेवक ते आमदार ते मुख्यमंत्री होतो.काय ? हे तुमचे प्रेम आणि ही एकनाथ शिंदे यांची जिद्दी, चिकाटी होती, शिंदे हे माणसातील मुख्यमंत्री असल्याचा गौरव उद्गार त्यांनी काढले.