जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल येथील माळी समाजाचा युवा कार्यकर्ता हा तन-मन-धनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेचे काम करत होता. सन 2009 मध्ये अहोरात्र मेहनत घेऊन याच गद्दार व खोके वाल्यांना आमदार करण्यास सिंहाचा वाटा राहिला. 2014 मध्ये देखील प्रचंड मेहनत घेतली त्यानंतर या माळी समाजाच्या युवा नेत्याकडे वाळूच्या व्यवसायातून दोन पैसे आले आणि त्यांची विधानसभेची इच्छा जागृत झाली. एरंडोल शहरात असे मोठे प्रकरण घडले आणि याच गद्दाराने व खोक्यावाल्यांनी षड्यंत्र रचले आणि गंभीर गुन्ह्यात या युवा नेत्याला अटकवले सुमारे तीन वर्षे जेलवारी करावी लागली समाजाच्या मनात प्रचंड चीड असून माळी समाजाच्या या युवा नेत्याला षड्यंत्र रचून आटकवल्यानंतर समाज खूप गद्दार खोक्यावाल्यांच्या मागे फिरला.
2019 ला आपल्याला नडणार म्हणून षडयंत्र रचले गेले शेवटी मी नियतीलाही मान्य नव्हते तो युवा नेता निर्दोष सुटला. आता 2024 ला माळी समाज या षडयंत्र असणाऱ्या समाजाचा कच्चीकरण करणाऱ्या गद्दार व खोक्यावाल्यांना ‘कात्रज’चा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही. तोडा व फोडा असे राजकारण खेळणाऱ्या खोक्यावाल्यांचे दिवस थोडेच उरले आहेत. आजपर्यंत गद्दार व खोक्यावाल्यांच्या मागे उभा राहिला माळी समाज आता त्यांच्या गोड बोलण्याला थारा देणार नाही असे चित्र सध्या एरंडोल विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले असून समाजामध्ये भांडण लावण्याचे काम या गद्दार व खोक्यावाल्यांनी पैशांच्या जीवावर केले आहे. आता तर गावागावात अनेक लोकांना पैशांनी विकत घेण्याचे काम खोक्यावाले करीत आहेत. यामुळे एरंडोल व पारोळामध्ये प्रचंड चीड निर्माण झाले आहे. पांढरा पेशी असलेला हा खोकेवाला मुलासाठी अवकाळा करीत आहे.
निष्क्रिय असलेला हा मुलगा विधानसभा ची निवडणूक गाठणार का जनता त्याच्या मागे उभे राहणार का माळी समाजावर झालेला अन्याय व षड्यंत्र रचून युवा नेत्याला अडकवणाराच्या पाठीशी उभा राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे समाजामध्ये प्रचंड चीड आहे . माळी समाज जागृत झाला आहे 2009 ला आमदार करण्यामागे माळी समाजाचा सिंहाचा वाटा होता परंतु राजकीय डावपेच खेळून समाजाच्या नेत्याला अडकविले गेले हा त्रागा कायम असून समाज काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे.