Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र लांबविले !
    क्राईम

    भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र लांबविले !

    editor deskBy editor deskAugust 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रस्त्यावर शतपावली करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री १०:३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, उषा शशिकांत हिंगोणेकर (वय ५७ रा. निर्मला रेसिडेन्सी, गुड्डूराजा नगर) ही महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्या आपल्या घराच्या आवारात रात्री १०:३० वाजता शतपावली करीत असताना त्यांच्या मागून एक इसम चालत आला. त्याने त्यांच्या गळ्यातून सोन्याची पोत ओढून घेतली. लागलीच पुढे दुचाकीवर उभ्या असलेल्या एका दुचाकीवरून दोन्ही चोरटे पसार झाले. ही घटना घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे मुद्देमाल घेऊन पसार झाले. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों योगेश पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.