जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे त्यातच जळगाव शहरात भाजपाला मानणारा मोठा वर्ग व मतदार आहे, परंतु गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील आमदार मामा आहे. अजूनही नगरसेवकाच्या भूमिकेतून बाहेर आले नाही. भाजपा नेते गिरीश महाजन यांनी महापालिकेत एक हाती सत्ता मिळवली तसेच मामाच्या घरात महापौर पद दिले परंतु आमदार मामाला भाजपाचे ते नगरसेवक ही सांभाळता आले नाही 28 नगरसेवक भाजपाचे फुटले यामुळे राज्यभर जळगाव शहरातील निष्क्रिय मामाचे नाव भाजपाच्या गोटात चर्चेत झाले. त्यातच शहरात संघटन आहे.
परंतु मामा त्या संघटनेचे नेतृत्व करू शकले नाही, काल परवा झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत समांतर रस्त्याचे काय झाले असा प्रश्न शहराचे आमदार विचारतात म्हणजे दहा वर्षे मामांनी काय केले हा प्रश्न जळगावकरांना पडला आहे तसेच अजूनही आमदार मामा स्वतःभोवती फिरतो आहे पक्ष संघटनेला शून्य फायदा होत असल्याने शहरात नेतृत्व तयार होत नाहीये, विकासाचे व्हिजन असलेला नेत्याच्या शोधात भाजपा नेते शहरात आहे त्यामुळे आमदार मामांच्या कामगिरीवर भाजपा नेते प्रचंड नाराज असून केवळ लेवा समाज म्हणून मामा नवा रुपाला आहे परंतु भाजपामध्ये लेवा समाजाचे नेतेही मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे भाजपाने मामाचे तिकीट कापले तर लेवा समाज नाराज होणार नाही याची कोणतीही शक्यता आता नाही.
उलट मराठा समाजावर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय आहे चाळीसगावचे आमदार सोडले तर एकही भाजपाचा मोठा पदाधिकारी भाजपात मराठा समाजाचा नाही. सर्वात मोठा भाऊ मराठा समाज जळगाव जिल्ह्यात आहे त्या समाजावरच भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याने जळगाव शहरातील मामाची भाकरी फिरवण्याची शक्यता भाजप नेते करणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत विधानसभेत व देशात भाजपाची सत्ता असताना मामांना जळगाव शहरासाठी असे भरीव काम करता आले नाही अशी एक हाती सत्ता कुठल्याही आमदाराला या अगोदर मिळाली नाही तरीसुद्धा सुरेश दादांचा काळातला विकास हा लक्षणीय आहे एक हाती सत्ता मिळूनही मामा निष्क्रिय ठरल्याने भाजपा नेते प्रचंड नाराज असून जनता ही नाराज आहे तसेच जळगाव शहरात जर भाकरी फिरवली नाही तर भाजपाला इतर जागांवर मराठा समाजाकडून फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.