• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यातील ‘या’ मतदार संघात होवू शकते बंडखोरी ; दादांची डोकेदुखी वाढणार ?

editor desk by editor desk
August 7, 2024
in राजकारण, राज्य
0
राज्यातील ‘या’ मतदार संघात होवू शकते बंडखोरी ; दादांची डोकेदुखी वाढणार ?

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली असून महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना मोठी कसरत करावी लागेल. मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दादांसमोर मोठे चॅलेंज असणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचे आव्हान देखील दादांसमोर असेल. महायुतीतील जागावाटप झाल्यानंतर तब्बल 19 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामध्ये, सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या, काही मंत्र्यांच्या मतदारसंघातही बंडखोरीची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मंत्री हसन मुश्रीफ, आमदार नरहरी झिरवळ, आमदार सुनील शेळकर, सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता आहे. निफाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान अजित पवार गटाचे दिलीप बनकर विरुद्ध भाजपचे यतीन कदम यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ, दिंडोरी, कागल, इंदापूर, वडगाव शेरी, आष्टी, कोपरगाव, अहेरी, अकोले, पूसद, जुन्नर, वाई या मतदार संघात महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. महायुतीमधील अनेक नेते हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण, जागावाटपात भाजपचे पारडे जड असून अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. या बंडखोरीच्या शक्यतेमुळे महायुतीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Previous Post

मटनाच्या दुकानात वाद : एकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण

Next Post

बापरे : जळगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

बापरे : जळगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group