यावल : प्रतिनिधी
शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला तीन जणांनी आठवडी बाजारातून घेऊन गेले. आणि तिला तालुक्यातील एका गावात नेऊन झोपडीत दोन दिवस ठेवले आणि तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ही अल्पवयीन मुलगी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील आठवडे बाजारात आली होती. तेथून तिला दोन पुरुष आणि एका महिलेने तालुक्यातील एका गावात नेले. या घटनेनंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तेथून आणत कुटुंबाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तिघांविरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.