शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून पासून २४ जानेवारी रोजी पासून कोरोना संसर्ग कमी असलेल्या भागातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या की, “सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मागणी होत होती. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तरावार देण्याची मागणी होत होती. अशातच आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून म्हणजेच, 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती असणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी वर्षा गायकवाड यांनी बोलतांना नमूद केले आहे.