रावेर : प्रतिनिधी
जळगावमधील रामेश्वर कॉलनी परिसरातील शाळकरी मुलगा रावेरमध्ये सापडला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलाने अपहरण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रावेर आणि जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीतील शाळकरी मुलगा मंगळवारी रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे रडत येत होता. त्यावेळी रावेरमधील रहिवासी विक्रम राठोड यांच्या नजरेस पडला. राठोड यांनी मुलाला धीर दिला. आणि त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने अपहरण झाल्याचे सांगितले. राठोड यांनी मुलाला पोलिसांकडे नेले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाने रामेश्वर कॉलनीतील एका दुकानाजवळ कारचालकाने पत्ता दिला. आणि नंतर त्याला बेशुद्ध करत अपहरण केले. आणि नंतर त्याला रावेर येथील चौकात सोडून दिले. मुलाने सांगितलेल्या कथेत विसंगती असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात मुलाने सांगितल्याप्रमाणे कार दिसून आली नाही. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे फौजदार गोसावी रावेरात पोहोचले. त्यांनीही चौकशी केली. मात्र सबळ पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर पोलिस आणि मुलाचे नातेवाईक मुलाला घेऊन जळगावला परतले.