• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हवामान तज्ञ डख यांचा अंदाज : ‘या’ दिवसापर्यत चालणार पाऊस !

editor desk by editor desk
August 6, 2024
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
हवामान तज्ञ डख यांचा अंदाज : ‘या’ दिवसापर्यत चालणार पाऊस !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने प्रचंड जोर धरला असून काही ठिकाणी मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्यात जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र यानंतर मोसमी पाऊस विश्रांती घेणार आहे. 9 आणि 10 तारखे नंतर राज्यात कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार असा अंदाज आहे.

डख यांनी सांगितल्याप्रमाणे, 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत राज्यातील विदर्भ विभागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा विभागात दररोज दुपारी तीन-चार वाजेनंतर पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आणि दररोज या विभागात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील या कालावधीमध्ये समाधानकारक असा पाऊस पडणार आहे. या विभागातही सरीवर सरी असा पाऊस सुरूच राहणार आहे. 8 ऑगस्टपर्यंत कोकणातही चांगला पाऊस पडणार आहे. कोकणात पावसाची तीव्रता इतर भागांपेक्षा अधिक राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात देखील 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, इगतपुरी, नाशिक, मालेगाव या भागात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ! : अतीवृष्टीमुळे खरीप पीकांना बसलाय फटका

Next Post

ताकदीने मैदानात उतरा, सर्व जागा आपल्या महायुतीच्या येणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

Next Post
ताकदीने मैदानात उतरा, सर्व जागा आपल्या महायुतीच्या येणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

ताकदीने मैदानात उतरा, सर्व जागा आपल्या महायुतीच्या येणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group