लाकूड कोळसा वाहतूकीची परवानगी नाहीच – वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुक्यातील सोनवद आणि नांदेड शिवारात लाकडांपासून कोळसा पाडण्याचा गोरखधंदा मोठ्याप्रमाणावर सुरू आहे. कोळसा तयार करून वाहतूक करण्याची कोणतीही परवानगी दिलेली नसतांना हा प्रकार खुलेआम सुरू आहे. यासाठी वनविभाग प्रशासनाला माहिती असतांना कोणतीही कारवाई केली जात नाही.
धरणगाव तालुक्यातील सोनवद आणि नांदेड शिवारात मोठ्याप्रमाणावर झाडे आहेत. शेतशिवारातील शेतकरी हे व्यापाऱ्यांना हाताशी घेवून १० ते २० वर्षांपासूनचे असलेले मोठे झाडे तोडण्यात येत आहे. यात सुळबाभूळ, निंब आणि कोटेरी बाभुळ या झाडांचा समावेश आहे. मोठी झाडे अवघ्या काही मिनीटात मशिनीच्या सहाय्याने कापून त्यांना जागेवरच जाळून त्याचा कोळसा तयार केला जातो. हा कोळसा जिल्हा बाहेर नेले जाते. या परिसरातील काही स्थानिक नागरीक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी वनविभागाकडे तक्रार करून कारवाईसाठी निवेदन दिले होते. सोबत कोळसा पाडण्याच्या ठिकाणचे काही फोटो देखील दाखविण्यात आले होते. असे असतांना वनविभागाचे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
– कोट
स्थानिक पातळीवरून लाकडापासून कोळसा तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीला ग्रामपंचायत, तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जाते. आणि कोळसा वाहतूकीसाठीचा परवनगी ही हद्दीतील वनविभागाकडून दिली जाते.
– श्री. दत्तात्रय लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी, धरणगाव
– कोट
धरणगाव तालुक्यात लाकडांपासून कोळसा तयार करण्याची कोणतीही परवानगी यावर्षी दिलेली नाही. जर मोठे झाडे कापून लाकडांपासून कोळसा तयार केला जात असेल तर संबंधित व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालय किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
– तहसीलदार नितीनकुमार देवरे, धरणगाव


