Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज ठाकरेंची घोषणा : दोन उमेदवारांचे नावे केले जाहीर
    राजकारण

    राज ठाकरेंची घोषणा : दोन उमेदवारांचे नावे केले जाहीर

    editor deskBy editor deskAugust 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात मोठी आघाडी घेतली असून त्यांनी विधानसभेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे. आपण राज्यातील जवळपास 250 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार मनसेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना मनसेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

    पंढरपूर विधानसभेमध्ये समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात मनसेने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अजय चौधरी शिवडी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकंदरीत एक उमेदवार हा उद्धव ठाकरे गटाविरोधात तर एक उमेदवार हा भाजप विरोधात दिल्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे हा तगडा प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    राज ठाकरे यांनी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मनसेचे काम, राज ठाकरे यांच्या कामावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे पंढरपूर मधून निश्चितपणे मनसेचा उमेदवार विजयी होईल असा दावा दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. उमेदवार मी असो किंवा कोणीही असो, पंढरपूरमधून राज ठाकरे यांचा उमेदवार विजयी होईल, असा दावा दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. मागील दहा वर्षापासून मी या मतदारसंघात काम करत आहे. तसेच या मतदारसंघातील सर्व प्रश्न आजपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करत आलो आहे. आणि यापुढे देखील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचा दावा दिलीप धोत्रे यांनी केला आहे. पांडुरंगाचा प्रसाद म्हणून यावेळी मनसेचा आमदार विधानसभेत निवडून जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिलीप धोत्रेचे काम सर्वांना माहिती आहे. पॅरलर सरकार म्हणून आजपर्यंत काम केले आहे. त्यामुळे आमच्यासमोर कोणाचेच आव्हान नसल्याचा दावा देखील धोत्रे यांनी केला आहे.

    शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी हे उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बाळ नांदगावकर असा सामना आता रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. मनसेच्या स्थापनेपासून ते राज ठाकरे यांचे एकनिष्ठ मानले जात आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.