लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील किनगाव-ईचखेडा रस्त्यावरून विनापरवाना ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर यावल पोलीसांनी कारवाई केली. यावल पोलीसात ट्रक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “यावल तालुक्यातील किनगाव ते ईचखेडा रस्त्यावर यावल पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना मंगळवारी, १८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रक्टर (एमएच १० सीवाय ४१६१) व विना नंबरची ट्रॉली यात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करतांना आढळून आले. वाळू वाहतूकीचा परवाना मागितले असता ट्रक्टर चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी सुशिल घुगे यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर यावल पोलीसात जमा करण्यात आले.
पोहेकॉ सुशिल घुगे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गुणवंत गणेश सोळुंखे आणि दिपक गणेश सोळुंखे दोन्ही रा. कोळन्हावी ता. यावल यांच्या विरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र बागुले करीत आहे.