जळगाव : प्रतिनिधी
तीन महिन्यांपासून दरोडा टाकून फरार असलेल्या सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर (वय २७, रा. दोडाईचा, ता. शिंदखेडा) हा शिरपुरकडे जात असतांना त्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पाच हजार ७०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातील सुलतान पिंजारी हा तीन महिन्यांपासून फरार होता. तो दोंडाईचाहून शिरपूरकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउनि गणेश वाघमारे, अनिल जाधव, पोहेकॉ विलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळून पिंजारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले.