जळगाव : प्रतिनिधी
पत्नी माहेरी गेलेली असताना विजय काव्या पावरा (१९, रा. खळवाडी, जुने जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी (४ ऑगस्ट) साडेआठ वाजेच्या सुमारास वडील त्याला बोलविण्यास गेले त्यावेळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळ चोपडा तालुक्यातील रहिवासी असलेले पावरा कुटुंब सध्या जुने जळगाव परिसरात राहते. यातील विजय पावरा याची पत्नी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी गेली आहे. त्यामुळे विजय हा घरी एकटाच होता. त्याच्या खोलीच्या शेजारी त्याचे आई- वडील, भाऊ राहतात.