धरणगाव : प्रतिनिधी
मैत्रीचा गैरफायदा घेत विवाहितेवर एकाने अत्याचार केला, तर दोघांनी धमकी दिली. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिकेत जिजाबराव पाटील याने पीडितेसोबत मैत्री केली. दोघे जण फोनवर बोलत असत व सोशल मीडियावर मॅसेज करत असत. दरम्यान, पीडिताला घरी एकटी असताना जून २०२४ मध्ये तीनवेळा घरात येऊन जबरदस्तीने संबंध ठेवले, तसेच गावातील धीरज भाऊसाहेब पाटील, नीलेश ऊर्फ बाळा मनोहर पाटील, हिरालाल ऊर्फ बाळा शांताराम पाटील यांनी पीडिता घरात एकटी असताना घरात घुसून धमकी दिली. कोणास काही सांगितल्यास नवऱ्यास जिवे मारण्याची धमकी दिली. नीलेश पाटील याने पीडितेच्या घराच्या खिडकीतून मोबाइल नंबर लिहिलेली चिठ्ठी फेकली. दरम्यान, रात्री अज्ञाताने पीडितेच्या घराच्या जिन्यात विटा मारून फेकल्या. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहेत.