जळगाव : प्रतिनिधी
आजाराला कंटाळून अश्विनी प्रकाश पाटील (१८, रा. कासमवाडी) या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अश्विनी पाटील ही कासमवाडी परिसरात आई, वडील, दोन भावांसह राहत होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खासगी वाहनांवर चालक आहे. काही दिवसांपासून तिला आजार होता. त्यामुळे ती तणावात होती. शनिवारी (३ ऑगस्ट) घरी कोणी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी अश्विनीला जीएमसीता दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.