Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेक्षकांना आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर – २”
    राजकारण

    प्रेक्षकांना आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर – २”

    editor deskBy editor deskAugust 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या काही दिवसापासून “धर्मवीर – २” चित्रपटाची जोरदार तयारी सुरु झाली असून आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून “धर्मवीर – २” ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकहीं करण्यात आले होते.

    सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला “धर्मवीर २” हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.

    चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती. अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते. परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती. सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ २७ सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. “धर्मवीर – २” हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.