Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपमुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका !
    राजकारण

    उपमुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका !

    editor deskBy editor deskAugust 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पुणे येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यावर फडणवीस यांनी देखील पलटवार केला आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार? अशा शब्दात त्यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी, एक तर तू राहशील किंवा मी राहिल, असे आवाहन दिले होते. त्यानंतर फडणवीसांनीही पलटवार केला होता. माझ्या माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेले होते. त्यामुळे काही जणांना वाटले की मी त्यांना आव्हान दिले. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिले जात नाही, ढेकणं चिरडायची असतात अश शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडवीसांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेवरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरे डोके बिघडल्यासारखे बोलत असल्याचे म्हटले आहे.

    उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अशा प्रकारे वैफल्यातून आणि निरशेतून ते डोके बिघडल्यासारखे बोलत आहेत. अमित शहा यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचे म्हटले होते, तेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सिद्ध करत असल्याचा खोचक टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे उद्धव ठाकरे दाखवून देत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.