Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोटार लावताना विजेचा धक्का : शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
    क्राईम

    मोटार लावताना विजेचा धक्का : शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून संजय बापू पाटील (४२, रा. धानवड, ता. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२ ऑगस्ट) उमाळा शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धानवड येथील शेतकरी संजय पाटील यांचे उमाळा शिवारात शेत आहे. शुक्रवारी सकाळी ते पत्नी, भावजयी व पुतणीसह शेतातील पाणी काढण्यासाठी गेले होते. यासाठी मोटार सुरु करण्यासाठी पाटील हे गेले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मजुरांच्या मदतीने पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांची गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजयी व पुतणे असा परिवार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.