लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत असतांना पोलीसांनी दोन संशयित आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी खाक्या दाखवताच चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी प्रमाण वाढले आहे. गेल्या आठ दिवसात धरणगाव पोलीसा दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहे. मंगळवारी १८ जानेवारी रोजी रात्री धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना संशयित आरोपी निरंजन पाटील (रा.शेवगाव) आणि सागर वालदे (रा.मालपुर ता. पारोळा) अशा दोघांना नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून पकडले होते. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे सांगितले. त्यांना पोलसांनी खाक्या दाखवता धरणगाव येथून २, एरंडोल येथून १ तर चोपडा येथून १ अश्या एकुण चार चोरीच्या दुचाकी काढून दिल्या आहे.
दोघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, पोलीस नाईक राजू पाटील, ईश्वर शिंदे, नाना ठाकरे, पोहेकॉ चंद्रकांत पाटील आदी करीत आहे.