Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उद्धव ठाकरे, संजय राऊतांना २ हजारांचा दंड ; वाचा काय आहे प्रकरण
    राजकारण

    उद्धव ठाकरे, संजय राऊतांना २ हजारांचा दंड ; वाचा काय आहे प्रकरण

    editor deskBy editor deskAugust 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील शिंदे गटातील माजी खासदार राहुल शेवाळे यांची मानहानी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना 2 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

    न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहे. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 1 हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित 2 हजार रुपये असा दंड दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने दिले आहेत.

    प्रकरण नेमके काय?
    ठाकरे गटाच्या मुखपत्रात एक लेख प्रसिद्ध झाला होता. यामध्ये आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची तक्रार न्यायालयात राहुल शेवाळे यांनी केली होती. 29 डिसेंबर 2022 ला हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता, असा दावा शेवाळेंकडून करण्यात आलेला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यापूर्वी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज मेंटेनेबल नाही, असा दावा राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी केला. राहुल शेवाळे हे शिवसेनेत 30 वर्षे होते, त्यामुळे आता त्यांना टार्गेट केले जात आहे, असाही दावा शेवाळे यांच्या वकिलांनी केला होता. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी शेवाळे यांच्या वकिलाने केलेला दावा खोडून काढला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.