Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लक्झरी बस व डंपरचा भीषण अपघात : १८ ते २० प्रवासी जखमी
    क्राईम

    लक्झरी बस व डंपरचा भीषण अपघात : १८ ते २० प्रवासी जखमी

    editor deskBy editor deskAugust 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पाचोरा तालुक्यातील वावळदा रोडवर लक्झरी बस व डंपरच्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून ज्या वळणावर अपघात झाला त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. यापूर्वी याच ठिकाणी अपघात झाला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा – जळगाव रोडवरील पाचोरा रोड हॉटेल प्रधान जवळच सुरेश विक्रम पाटील यांच्या शेताजवळ नागमोडी वळण आहे. वावडदेकडून जाणारी एल एच पाटील कन्स्ट्रक्शन ची डंपर क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77 व पाचोरा कडून येणारी लक्झरी बस क्रमांक एम एच 19 वाय 3359 मध्ये भीषण अपघात घडल्याची घटना आज दि. 1 गुरुवार रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली. पाचोरा – जळगाव प्रवासी ने आण करणारी लक्झरी बस ही पाचोरा येथून प्रवासी भरून जाररगाव चौफुली वरून निघून जळगावच्या दिशेने जात असताना वावडदे गावाजवळील वळणावर जळगाव कडून पाचोरा च्या दिशेने येणाऱ्या डंपर (क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77) व लक्झरी बस (क्रमांक एम एच 19 वाय 3359) या बसची जोरदार आमने-सामने धडक झाली. हा अपघात इतका मोठा होता की यात दूरपर्यंत आवाज जावून लक्झरी बस एका बाजूने चिरफाडली गेली. यात लक्झरी बस चालक- वाहक व प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    घटना घडली त्यावेळी वावळधा गावातील गावकऱ्यांनी धाव घेत गंभीर जखमींना तात्काळ जळगाव कडील रुग्णालयाकडे रवाना केले आहे. या घटनेत सुमारे 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सदर लक्झरी बस त्यावरील चालक व मालक हे वडली गावातील असल्याची माहिती समोर येत आहे. तर या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली होती. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.