चोपडा : प्रतिनिधी
अवैधरित्या गाईंची वाहतूक करणाऱ्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाच जणांवर ३१ रोजी पहाटे चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. यात दोन्ही मिळून १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अमोल शिवाजी सुरळकर (वय २२), गणेश रमेश राऊत (वय २६) व आकाश दादाराव राऊत (वय २१) व भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथील योगेश मिरचंद रिसवाल (वय २५) हे चौघे ३१ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास दोन बोलेरो चारचाकी गाडी (एमएच १९सीवाय ६३०७ व एमएच- २०, इएल ८५५६) मधून अवैधरित्या १ लाख ८० हजारांच्या ६ जर्सी गाईं व १० हजाराचे दोन वासरू घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी शहरातील गोल मंदिराजवळ पकडले. यात गाडीसह ८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पो.कॉ. अक्षय पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघाविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत ३१ रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ बोलेरो चारचाकी (एमएच- २०, जिसी- ७९०८) तून सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अभिषेक कौतिक तायडे (वय २३) हा अवैधरित्या ९० हजारांच्या ३ जर्सी गाई व ५ हजाराचे एक वासरू घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. यात गाडीसह लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पो.कॉ. योगेश बोडके डके यांच्या फिर्यादीवरून अभिषेक तायडे याच्याविरोधात शहर पोलिसात गुना दाखल झाला आहे. तपास स.फी. जितेंद्र सोनवणे करत आहेत. दोन्ही घटनेत पोलिसांनी १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन यातील पाच्चती आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे