Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुध संघात दुपारच्या सुमारास वाद ; एकाला बेदम मारहाण
    क्राईम

    दुध संघात दुपारच्या सुमारास वाद ; एकाला बेदम मारहाण

    editor deskBy editor deskAugust 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्हा दूध संघामध्ये मद्याच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने दोन जणांनी सुपरवायझरशी वाद घालत योगेश भागवत निंबाळकर (४१, रा. जळगाव) या कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (३० जुलै) दूध संघ परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, दूध संघामध्ये चालक असलेले संजय छगनलाल पाटील, मोहन रुपवते हे दूध संघात मद्याच्या बाटल्या सोबत घेऊन आल्याने सुपरवायझर मुकेश निंबाळकर यांनी त्या दोघांना आत जाण्यास नकार दिला. त्यावेळी दोघे मुकेश यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांशी वाद घालून निघून गेले. संध्याकाळी वरील दोघे जण मद्यपान करून त्यांच्यासोबत तीन जण घेऊन आले. त्यांनी मुकेश निंबाळकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेथे योगेश निंबाळकर हे आवरण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. राजू पाटील याने लाकडी दांडका मारून जखमी केले.

    या प्रकरणी योगेश निंबाळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय पाटील, मोहन रुपवते, राजू पाटील व इतर दोन जण (नाव समजू शकले नाही) अशा पाच जणांविरुद्ध बीएनएस कलम ११५ (२), ११८(१), ३५२, १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों फकिरा रंधे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.