रावेर : प्रतिनिधी
रावेर-यावल परिसरासाठी वरदान असलेले गारबर्डी धरण यंदा देखील पूर्ण भरले आहे. वरुण राजाची कृपा राहिल्याने सुकी नदीला चांगले पाणी आले आल्याने सुकी धरण भरले. परिसरातील शेतकरी बांधव आनंदित झाले असून पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. धरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी आणि परिसरातील नागरिकांतर्फे जलपूजन करण्यात आले.
आज मंगळवार दि.३० जुलै रोजी पाल परिसरातील गारबर्डी धरण येथे जलपूजन सोहळा प्रहार जनशक्ती पक्ष आणि अनिल चौधरी मित्र परिवार वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. रावेर-यावल तालुक्यावर यंदा वरुणराजाची कृपा राहिल्याने पाऊसपाणी चांगला आहे. यंदा धरण पूर्ण भरले असून ओसंडून वाहू लागल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत. कालच धरण पूर्ण भरल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गारबर्डी धरण यावल-रावेर तालुक्यासाठी वरदान असून शेतकरी बांधव व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. निसर्गाची कृपा आपल्यावर अशीच रहावी, अशी प्रार्थना अनिल चौधरी यांनी केली.
गारबर्डी धरणावर जलपूजन आणि सुकी माईचे आभार मानताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, रावेरचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगरसेवक करीम मण्यार, प्रहार शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, रावेरचे अमोल महाजन, विलास पांडे, सावखेडा सरपंच रवी महाजन, विवरे उपसरपंच विकास पाटील, जुमा तडवी, पालचे दिलीप बंजारा, सरपंच नंदकिशोर महाजन, राकेश भंगाळे, धीरज चौधरी, रावेर प्रहार तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, पिंपरकुंड सरपंच दिलीप बारेला, अतुल तडवी, मनीष चौधरी व समस्त शेतकरी बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.