धरणगाव : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना घेवून जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात एक महिला जागीच ठार तर इतर ७ महिला व चालक गंभीर जखमी झालेत. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजारी समितीजवळून चारचाकी वाहन शेतमजूर महिलांना शेतात कामासाठी घेवून जात होते. मंगळवारी ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितच्या पुढे रस्त्यावर अचानक कार पलटी झाली. या अपघातात वाहनात बसलेले बसलेले सर्व जण कमी अधिक प्रमाणात जखमी झाले आहेत. यात जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चंद्रकलाबाई महाजन यांचा मृत्यू झाला आहे.
तर उषाबाई गुलाब महाजन वय ३५, निताबाई अशोक महाजन वय ४०, स्वाती शिवाजी वाघ वय ३४, जिजाबाई लक्ष्मण महाजन वय-६०, मधुरी दिपक महाजन वय-३८, सुमन महाजन, ढगूबाई महाजन हे जखमी झाले आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर वाहनचालका हा वाहन सोडून पसार झाला आहे. जखमींना सुरूवातील धरणगाव ग्रामीण रूग्णालयात प्राथमोपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.