Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १५ दुचाकी चोरी, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
    क्राईम

    १५ दुचाकी चोरी, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

    editor deskBy editor deskJuly 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील अनेक शहरातून दुचाकी चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पोलिसांनी १५ चोरीच्या दुचाकीचा उलगडा केला आहे. पाचोरा तालुक्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चोरीच्या १५ दुचाकींसह पाचोरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दुपारी १ वाजता दिलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागातून विविध प्रकारच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हे दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी विशाल पांडुरंग पाटील वय-२६, रा. गजानन नगर, पाचोरा आणि रवींद्र बाबुराव पाटील वय-२९ रा. गोंडगाव तालुका भडगाव या दोघांना चोरीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई १८१०) सह पाचोरा पोलीसांनी अटक केली आहे.त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर चोरीच्या १४ अश्या एकुण चोरीच्या १५ दुचाकी काढून दिल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ राहुल शिंपी, रणजीत पाटील, श्यामकांत पाटील, योगेश पाटील, विनोद बेलदार, सचिन पवार, हरीश अहिरे आणि सुनील पाटील यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.